Ad will apear here
Next
‘स्वेरी’च्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा नऊ डिसेंबरला पुण्यात
सोलापूर : ‘पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅंड रिसर्च इन्स्टिट्यूट (स्वेरी) संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे ‘ऋणानुबंध २०१८’ या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांसाठी असलेल्या मेळाव्याचे आयोजन या वर्षी पुण्यातील कोथरूड येथे करण्यात आले आहे. हा मेळावा नऊ डिसेंबरला होईल,’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांनी दिली.

या मेळाव्यात माजी विद्यार्थ्यांसाठी चर्चा, सुसंवाद, नव्या विचारांबरोबरच जुन्या आठवणींच्या शिदोरीची देवाणघेवाण, काम करत असलेल्या ठिकाणी आलेले अनुभव कथन असे अनेक भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. महाविद्यालयातर्फे माजी विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात येईल. ‘लवाल इंडिया’ कंपनीचे व्हाइस प्रेसिडेंट-एचआर विनोद बिडवाईक हे या मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून अल्फा उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत; तसेच संस्थेचे सचिव व प्राचार्य डॉ. रोंगे, ट्रेनिंग अॅंड प्लेसमेंट अधिष्ठाता व माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव डॉ. माधव राऊळ, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष महेश कांबळे यांच्यासह इतर पदाधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.

मेळाव्यादरम्यान जुन्या आठवणींना उजाळा देऊन गतकाळात घडलेल्या प्रमुख घटनांचा आढावा घेण्यात येणार आहे. यामध्ये संस्थेच्या स्थापनेपासून म्हणजे १९९८पासून ते गत वर्षीपर्यंत उत्तीर्ण झालेले विद्यार्थीही सहभागी होणार आहेत. ‘स्वेरी’मध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या निमित्ताने पुणे, मुंबई, बेंगळुरूसह अन्य प्रमुख शहरांमध्ये व परदेशात स्थायिक झालेले माजी विद्यार्थीदेखील या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

अधिकाधिक विद्यार्थी हे पुण्यात स्थायिक झाले असून, अनेकांना कामाच्या व्यापामुळे पंढरपुरात येणे शक्य होणार नसल्याने हा मेळावा कोथरूड येथे आयोजित केल्याचे डॉ. राऊळ यांनी सांगितले. 

मेळाव्याविषयी : 
दिवस : रविवार, नऊ डिसेंबर २०१८ 
स्थळ : पुण्याई सभागृह, पौड रोड, कोथरूड, पुणे.
अधिक माहितीसाठी संपर्क : डॉ. माधव राऊळ- ९५४५५ ५३८८१.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZWQBV
Similar Posts
‘टेक्नोसोसायटल– २०१८’ तंत्रपरिषदेचे पंढरपुरात आयोजन पंढरपूर : ‘‘टेक्नोसोसायटल-२०१८’ या आंतरराष्ट्रीय तंत्रपरिषदेचे येत्या १४ आणि १५ डिसेंबर २०१८ या दोन दिवशी पंढरपूर येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये (स्वेरी) आयोजन करण्यात आले आहे. देशातून आणि परदेशातूनही अनेक संशोधक, शास्त्रज्ञ या परिषदेला उपस्थित राहणार आहेत,’ अशी माहिती संस्थेचे
‘सोलापुरात फळ सुविधा केंद्र उभारणार’ सोलापूर : ‘सोलापूर व आसपासच्या परिसरातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या फळांची चांगल्याप्रकारे साठवणूक व्हावी, त्यावर प्रक्रिया करता यावी यासाठी पणन मंडळामार्फत सोलापुरात फळ सुविधा केंद्र उभारण्यात येणार आहे,’ अशी घोषणा सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी केली.
‘स्वेरी’तर्फे पंढरपुरात येणाऱ्यांसाठी शुद्ध पाणी वाटप सोलापूर : आषाढी वारीसाठी पंढरपुरात आलेल्या वारकऱ्यांना शुद्ध पाणी देण्याचे उत्तम कार्य श्री विठ्ठल एज्युकेशन अॅंड रिसर्च इन्स्टिट्यूट (स्वेरी) करत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यअधिकारी प्रा. श्रीकांत भारतीय यांनी पंढरपूर येथे केले.
उसात ज्वारीचे आंतरपीक बहरले सोलापूर : रब्बी ज्वारीसाठी प्रसिद्ध असलेल्या सोलापूर जिल्ह्याच्या पंढरपूर तालुक्यातील आजनसोंड येथील शोभा हनुमंत घाडगे या शेतकरी महिलेने ऊस पिकात घेतलेले ज्वारीचे आंतरपीक बहरात आले आहे. ज्वारीच्या कणसातील पांढऱ्या-शुभ्र टपोऱ्या दाण्यांमुळे जोंधळ्याला चांदणे लखडून गेल्याचे चित्र दिसू लागले आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language